अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ईडीकडून अटक

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील घरी ईडीने शुक्रवारी धाडी टाकल्या असतानाच, त्यापाठोपाठ त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे या दोघांना ईडीने मध्यरात्री अटक केली. तसेच अनिल देशमुख यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या ‘लेटरबॉम्ब’मुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या पत्रामध्ये  मुंबईतील हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दिलं होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तसेच या आरोपामुळे ते आधी सीबीआय आणि आता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.
देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील घरी ईडीने शुक्रवारी धाडी टाकल्या होत्या. त्यापाठोपाठ शनिवारी सकाळी त्यांचे स्वीय सहय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे या दोघांना ईडीने अटक केली. सचिन वाझे याने आपल्या जबाबात कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या दोघांचे नाव घेतले असून यातूनच या दोघांवर अटकेची कारवाई झाल्याची माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील 10 ते 12 बार मालकांचे जबाब नोंदवले आहेत. या बार मालकांनी चार कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याआधारे ईडीने ही कारवाई सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 435 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.